ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक मदन गडकरी यांचे निधन

0

नागपूर: ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य दिग्दर्शक मदन गडकरी यांचे सोमवारी मध्यरात्री दीड वाजता निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रायोगिक रंगभूमीला विदर्भात स्थान मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

‘पोहा चालला महादेवा’ हे त्यांचे गाजलेले नाटक. अलीकडेच गाजलेल्या ‘तानी’ चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीत त्यांचे अनेक शिष्य आहेत. महाराष्ट्र शासनाने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा