वि. सा. संघात कवी ग्रेस स्मृतिदिन कार्यक्रम

0

 

    नागपूर : कवी ग्रेस यांच्या ११व्या स्मृती दिनानिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालन, झाशी राणी चौक येथे  सोमवार दिनांक २७ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता कवी ग्रेस यांच्यावरील ललितबंधांवर आधारित नाट्य अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘जागर’ निर्मित ‘कवी जातो तेव्हा…’या डॉ. समीर वसंत कुलकर्णी लिखित आणि अमित वझे दिग्दर्शित या नाट्य अभिवाचन कार्यक्रमात गजानन परांजपे, अमित वझे, कौस्तुभ देशपांडे, जयदीप वैद्य आणि अपर्णा केळकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा