यवतमाळ.(FARMER) शेतीच्या वादातून माणूसकीचे मुडदे पाडले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal district) गेल्या दोन दिवसांमध्ये तिघांचे खून (three murders in two days ) करण्यात आले. या हत्यासत्रामुळे अवघा जिल्हा हादरला आहे. यातील दोन घटना आर्णी तालुक्यात (Arni ) तर तिसरी उमरखेड (Umarkhed)तालुक्यात घडली. आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा तांडा येथे दारूड्याने लहान भावाला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले. दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील अमडापूर येथे बसस्थानक परिसरात तर तिसरी घटना आर्णी तालुक्यातील आयता येथे घडली. एकीकडे शेतीचे वाद मिटविण्यासाठी राज्य शासनाचे ‘सलोखा’ अभियान सुरू आहे. त्याचवेळी मात्र शेतीच्याच वादातून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. आता शासन, गृहविभागानेच शेतीचे वाद मार्गी लावण्यासाठी कठोर पावले उचलण्यासाठी पाऊले उचलण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
आर्णी तालुक्यातील (Brahmanwada Tanda)ब्राह्मणवाडा तांडा येथे रविवारी सायंकाळी संजय शेषराव पवार (४२) रा. ब्राह्मणवाडा याने दारूच्या नशेत लहान भाऊ विजय शेषराव पवार (३८) रा. ब्राह्मणवाडा तांडा याला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले.
उमरखेड तालुक्यातील तालुक्यातील अमडापूर येथी बसस्थानक (BUS STAND)परिसरात आरोपी कुंडलिक जांबवंत राठोड (२५) रा. भाजूनगर तांडा, ता. उमरखेड याने प्रकाश परसराम राठोड (३०) रा. चिल्ली ई., ता. महागाव याच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केला. काही वर्षांपासून प्रकाश व कुंडलिकमध्ये शेतीचा वाद सुरू होता. रविवारी प्रकाश ५, ६ जणांना घेऊन कुंडलिकडे शेतीचा ताबा सोडून देण्याचा इशारा देण्यासाठी गेला. तेथे त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. तेव्हा कुंडलिकने धारदार चाकू प्रकाशच्या पोटात खुपसला. प्रकाशला उपचारासाठी उमरखेड येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. आरोपी कुंडलिक राठोड याला अटक करण्यात आली आहे.
बाप मरताच मुलगा जन्माला आला
तिसरी घटना आर्णी तालुक्यातील आयता येथे घडली. दोन गटांत मंदिराच्या शेतीच्या वादातून हाणामारी झाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या योगेश जोगमोडे (३०) या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान राजकीय वर्चस्वाच्या वादातून आपल्या मुलाचा बळी गेल्याचा आरोप योगेशचे वडील अशोक जोगमोडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यांच्या तक्रारीवरून आतापर्यंत ११ आरोपींना पारवा पोलिसांनी अटक केली आहे. राजू पंजवाणी (रा. आयता), सचिन राठोड, नितेश चव्हाण (दोघेही रा. अंतरगाव) यांना यापूर्वीच अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींपैकी सहाजणांना न्यायालयीन कोठडी, तर पाचजणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणात विशेष असे की हल्यात गंभीर जखमी योगेशचा शनिवारी मृत्यू झाला. सायंकाळी पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेशची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती होती. रविवारी सकाळी योगेशच्या पत्नीस प्रसवकळा सुरू झाल्या. तिला यवतमाळ येथे एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला.
चिकन भुना मसाला आणि हॉट हनी चिकन टॅकोस|Chicken Bhuna Masala Recipe|Honey Chicken Tacos Recipe|Ep-112