दोन बहिणींशी एकाचा विवाह अडचणीत, नवरदेवाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा, महिला आयोगाकडून दखल

0

सोलापूरः दोन बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याच्या अकलूज येथील घटनेची (Akluj Marriage case) राज्यभर चर्चा सुरु असताना या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणे नवरदेवाला महागात पडण्याची शक्यता हे लग्न कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. राज्य महिला आयोगाने (State Women Rights Commission) या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे हा गुन्हा असून सोलापूर पोलिस अधिक्षकांनी यासंदर्भात चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. अकलूज येथे हा अजब विवाह सोहळा 2 डिसेंबरला पार पडला होता. या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर लग्न केलं आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यांना लहाणपणापासून एकमेकींची फार सवय आहे. त्या दोघी एकमेकीपासून लांब राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याप्रकरणात आता नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही या लग्नाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेसंबधी चौकशीचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिले आहेत. यासंदर्भात माहिती देताना आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, “सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल Section 12 (1) and 12 (2) of the Maharashtra State Commission for Women Act, 1993 महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा.” असा आदेश चाकणकर यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना दिले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा