लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या मुलींचा संघ विजयी

0

17 वर्षाखालील जिल्हास्तरिय क्रिकेट स्पर्धा


भद्रावती. चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुल (District Sports Complex Chandrapur) येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत (under 17 cricket tournament) लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या (Girls’ team of Lokmanya Vidyalaya Bhadravati) मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात सर्वोदय विद्यालय सिंदेवाही या संघावर सात गडी राखून अंतिम सामन्यात विजय मिळविला. यानंतर नागपूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत लोकमान्य विद्यालय हा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्याकडे जिल्ह्यातील सर्वच क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते. त्यात लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या टीमने बाजी मारली. विजयी संघाचे सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
लोकमान्य भद्रावतीच्या विजेत्या संघात अमोली गेडाम, अवंतिका नागोसे, अश्विनी खुटे माटे, उमादेवी आस्वले, चंचल नागपुरे ,चित्रा वडस्कर, जान्हवी बोरीकर, तेजस्वी रोडे, अनन्या खारकर, धनश्री डाहुले ,प्रिया ढेंगळे, यशस्वी आ, राजश्री गेडाम ,लक्ष्मी बदखल , श्रावणी बोम्मावर या खेळाडूंचा सहभाग होता. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या मार्गदर्शक शिक्षकांना दिले. विजयी संघाचा लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रूपचंद धारणे तसेच शिक्षक प्रिया भास्करवार, सचिनकुमार मेश्राम ,विशाल गावंडे ,रवी नंदनवार, मयूर पोटे यांनी उपस्थित होते. खेळाडूंचे कौतुक केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा