राष्ट्रवादी काँग्रेस,युवक काँग्रेसचे रामदेवबाबा विरुद्ध आंदोलन प्रतिमेला काळे फासले

0

नागपूर : तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांविषयी आपत्तीजनक वक्तव्य प्रकरणी योगगुरू रामदेव बाबा विरोधात राज्यव्यापी सर्वपक्षीय संताप पहायला मिळत आहे. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने व्हेरायटी चौकात शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, शहर प्रवक्त्या नूतनताई रेवतकर यांच्या नेतृत्वात आंदोलनातून तीव्र संताप व्यक्त केला. युवक काँग्रेसने महाल येथील पतंजली स्टोअर्ससमोर घोषणाबाजी केली. पोस्टरला काळे फसले. देशभरातील महिलांची जाहीरपणे माफी मागत नाहीत तोवर पतंजलीची दुकाने उघडू दिली जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला.

शुक्रवारी पतंजली योगपीठाच्या वतीने आयोजित महिला योग संमेलनात हे विधान रामदेव बाबा यांनी केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासुद्धा उपस्थित होत्या यामुळे या विरोधाला अधिकच धार चढली आहे. रामदेवबाबा यांच्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटत आहेत. रामदेव बाबा यांनी संत या शब्दाला काळिमा फासला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कुठे काळे फासणे जोडे मारो आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला काळे फासले जात आहे हे विशेष.

*बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News*