पुणे : पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मागणीचा विचार करून शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढवून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वीच्या पद्धतीनुसार, बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र, त्यामुळे कॉपीच्या घटना पुढे येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम मंडळाने यावर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी, अशा प्रकारची मागणी सुरु होती.
मंडळाने आजच यासंदर्भात सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळेत किरकोळ बदल झाल आहेत. ते बदल अशा प्रमाणे राहणार असल्याचे मंडळाने नमूद केले आहे. परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी मंडळाने कंबर कसली असून त्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत.
सकाळचे सत्र:
> परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2
– परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 2:10 वाजेपर्यंत
> परीक्षेची सध्याची वेळ सकाळी- 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत
– परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:10 वाजेपर्यत
> परीक्षेची सध्याची वेळ -सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत
– सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:40 वाजेपर्यंत
दुपारच्या सत्रामध्ये सुधारित वेळापत्रक
> परीक्षेची सध्याची वेळ -दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
– सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी 6:10 वाजेपर्यंत
> परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत
– सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत
> परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत
– सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:40 वाजेपर्यंत