आरोग्यास धोकादायक १४ औषधांवर देशात अखेर बंदी

0

नवी दिल्ली: आरोग्यास धोकादायक ठरत असलेली अनेक औषध अद्यापही देशात वापरली जातात. आता केंद्र सरकारने अशा १४ औषधांवर बंदी घातली असून डीजीसीआय म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (DGCI bans 14 combinations Drugs) यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या १४ औषधांमध्ये फिक्स डोस कॉम्बिनेशन प्रकारात मोडणाऱ्या औषधांचा समावेश आहे. मंडळाच्या तज्ज्ञ समितीने ही औषधे मानवी आरोग्यासाठी घातक असून या औषधांच्या उपचारात्मकतेबाबत स्पष्टता नसल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती व तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. केंद्राने त्याला मंजुरी दिल्यावर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
औषधीशास्त्रात फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन म्हणजे दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळल्यावर तयार होणारे कॉम्बीनेशन होय. यात उदाहरणार्थ तापासाठी व अंगदुखीसाठी दिल्या जाणाऱ्या वेदनाशामक अशा निमसुलाईड आणि पॅरासिटॅमॉल, अॅमॉक्सिसीलीन आणि ब्रोम्हेक्सीन तसेच फोल्कोडाईन आणि प्रोमेथाझाईन सारख्या कॉम्बिनेशन औषधांचा समावेश आहे. या औषधांना कॉकटेल औषधे म्हणूनही ओळखले जाते.