विना अपघात सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा सत्कार, ४० नवीन बसेस देण्याची घोषणा – संजय राठोड

0

यवतमाळ-महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या एसटी बसची विना अपघात सेवा करणाऱ्या यवतमाळ आगारातील १२ चालकांचा, सहकुटुंबियांचा सत्कार पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यवतमाळ जिल्ह्यात ४० नवीन बसेस देण्याची घोषणा पालकमंत्री संजय राठोड यांनी केली.एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. चालक आपली सेवा प्रामाणिकपणे देत असल्याने सामान्य जनतेचा राज्य परिवहन महामंडळावरील विश्वास कायम आहे.