
(NAGPUR)नागपूर : नागपूर येथून रविवारी रेल्वेने 1700 राम भक्त अयोध्येसाठी रवाना झाले . भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रामभक्ताना रवाना केले. अयोध्येत राममंदिरात दर्शन करण्याची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होत आहे.
527 वर्षानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या राम मंदिर प्रतिष्ठापना झाली आहे. त्याठिकाणी जेव्हा दर्शन घेतलं जाईल तेव्हा तेव्हा नवीन ऊर्जा मिळेल. देशासाठी व समाजासाठी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल अशी भावना ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.