
(Wardha)वर्धा– वर्धा जिल्ह्याच्या इंझाळा, विजयगोपाल, तांबा परिसरात गारपीटसह पाऊस झाला. अचानक आलेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ उडाली.
या गारपीटीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत. संध्याकाळी पावसासह गारपीट झाली. गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले.