
नागपूर(Nagpur): माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या उबाठा गटाच्या जाहीरनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खंडणीखोर कशी थांबविणार लूट ? असा सवाल उपस्थित केला आहे.
सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना कवडीही दिली नाही.
नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागत आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे.
ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. शेवटी उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीला भुलणार नाही असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
















