आमच्या जाहीरनाम्यावर जनताच निर्णय घेईल

0

मुंबई (Mumbai):आमचा जाहीरनामा कसा,हे भाजप नेते नव्हे लोक ठरवतील ,त्यात युटर्नचा काय विषय आहे असा सवाल शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमधील पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावर उपाययोजना अशा अनेक भूमिका ज्या वचनाम्यात घेतलेल्या आहेत, त्याला विरोध आहे का? मोदींनी जे गेल्या दहा वर्षात वारंवार यु टर्न घेतलेले आहेत, त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे. आम्ही प्रथमच तीन पक्ष एकत्र आल्यावर आमची भूमिका जाहीर केली,ती यांना पोटदुखी आहे, विशेषत: महाराष्ट्राच्या दृष्टीने यांना चांगलं सहन होत नाही.

आज महाराष्ट्रातील आठ जागांवर मतदान होत आहे. आठही जागांवर महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला. तीन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढत आहे आणि आमच्यासमोर चोरलेली शिवसेना असा सामना आहे.या सर्व जागा आम्ही जिंकणार असून प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. 35 प्लस चा आमचा आकडा आहे. ईव्हीएम मशीनवर लोकांना संशय आहे.हे वारंवार होतंय किंवा केलं जाईल, अमरावतीमध्ये तर कुठेही अघोरी कृत्य होऊ शकतं अशी भीती आहे.वर्ध्यामध्ये भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ईव्हीएम मशीन बंद पडणं, मतदारांचा खोळंबा आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो.

संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि नंतर ज्यांना हव्या आहेत त्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेतल्या मोदीकृत भाजपचं षडयंत्र आहे असा आरोप राऊत यांनी केला. रोज आचारसंहिता उल्लंघन होत असताना निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत आहे का? जर ही हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचे बटन दाबा हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कार्यवाही झाली असती, खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्री पदावरून दूर करायला हवं, अमित शाह रामलल्लाचं दर्शन मोफत करू हे सांगत होते तेव्हा हा निवडणूक आयोग कुठे होता?
जय भवानी, जय शिवाजी यावर आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे. रामलल्ला,बजरंगबलीवर प्रचार होत आहे यावर आक्षेप नाही का असेही
खासदार संजय राऊत म्हणाले.