तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा

0
rain
rain

राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाने काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिलाय. काही ठिकाणी तापमान कायम राहील, असाही अंदाज दिला. मागील काही दिवसांपासून नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याच दिसून आलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे तापमानात काहीशी घट झाल्याचा दिसून आलं. वरोरा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विज आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, लातूर, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. आज दुपारच्या सुमारास वादळीवारासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याचा दिसून आलं होतं. आज दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे तापमानात काहीशी घट झाल्याचा दिसून आलं. वरोरा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याचा वृत्त आहे. आज दुपारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली असून, या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे.