केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

0
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारावर कोणतीही बंदी असणार नाही.

दिल्ली(Delhi) दारू धोरण प्रकरणी केजरीवाल 40 दिवस तिहार तुरुंगात आहेत. आज संध्याकाळपर्यंत ते तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. न्यायालयाने शुक्रवारी दुपारी दोन वाजता एका ओळीत आपला निकाल जाहीर केला. न्यायालयाचा पूर्ण आदेश अद्याप आलेला नाही. मद्य धोरण प्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती.

ईडीने त्यांना 22 मार्च रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते, जी नंतर 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. 1 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले होते.

मद्य धोरण प्रकरणात, केजरीवाल यांना 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी गेले नाही. कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.