नागपूर 26 तर रामटेकसाठी 28 उमेदवार रिंगणात

0

‘मिशन डिस्टिंक्शन’ यशस्वी करण्याचे आवाहन

नागपूर(Nagpur)- जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार निवडणूक रिंगणात
नागपूर लोकसभा मतदार संघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर रामटेकसाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघ मिळून एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून नागपूर आणि रामटेक मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
केंद्रांवर आवश्यक व्यवस्था
मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यात प्राथमिक वैद्यकीय सुविधा, प्रायोगिक तत्वावर टोकन पद्धती, पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा, व्हिलचेअरची व्यवस्था आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन डिस्टिंक्शनचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे मिशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. इटनकर यांनी केले आहे.