मृतांचा आकडा 14 वर:75 हून अधिक जखमी

0

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला, सोमवारी धुळीच्या वादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर 75 जण जखमी झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.

 

मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर 78 हून अधिकांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिघा- चौघांची चिंताजनक आहे.

मुंबईत धडकलेले धुळीचे वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर बॅनर, होर्डिंग आदी वादळात कोसळले. तसेच एवढा मोठा होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 75 जण जखमी झाले आहेत. ल या वादळामुळे संपूर्ण शहरात धुळीची चादर पसरून अंधार पसरला होता. या वादळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. होर्डिंग पडल्याची घटना मुंबईतील घाटकोपर परिसरात घडली असून त्याखाली अनेक लोक दबले आहेत. घटकोपर परिसरातील पेट्रोल पंपासमोर लावलेला जाहिरात फलक वादळामुळे पंपाच्या मधोमध पडला, तिथे उपस्थित असलेले लोक त्याखाली दबले गेले. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघात स्थळाची पाहणी केली. तसेच मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

धुळीच्या जोरदार वादळामुळे दुपारी 3 वाजता आकाशात काळ्या ढगांची दाटी झआली होती. वाऱ्यामुळे झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. महानगराच्या विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत लोकांच्या अडचणी आणखी अडचणींचा समाना करावा लागला. त्याचवेळी विद्युत तारेवर होर्डिंग पडल्याने आरे ते अंधेरी पूर्व दरम्यान मेट्रो धावू शकली नाही. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या मार्गावरील खांब वाकल्याने गाड्यांवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या मुख्य प्रवक्त्याने सांगितले की, मुख्य मार्गावरील उपनगरीय सेवा बंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसाने उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी कळवा आणि ठाण्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगर परिसरात पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.