मुंबई : भाजप लोकसभेचा 2024 चा रणसंग्राम हा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President JPNadda Tenure Extended) यांच्याच नेतृत्वात लढणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. हिमाचल प्रदेशमधील पराभवामुळे नड्डा यांना मुदतवाढ मिळणार का, यावर प्रश्नचिन्ह लागले होते. मात्र, आज त्यावर पक्षाने निर्णय घेतला. नड्डा यांच्या कार्यकाळातच भाजपने बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, मणीपूर, आसाम, गोवा आणि गुजरातमध्ये मोठा विजय मिळवला आहे.
भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भात माहिती देताना गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नड्डा यांच्या कार्यकाळातच भाजपने बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, मणीपूर, आसाम, गोवा आणि गुजरातमध्ये मोठा विजय मिळवला आहे. गोवा आणि गुजरातमध्ये नड्डांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वात बुथ सशक्तीकरण मोहीम राबवून ती यशस्वी करण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी लोकसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. त्याआधी याच वर्षात 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार असून या सर्व निवडणुका जे. पी. नड्डा यांच्याच अध्यक्षतेखाली लढवल्या जाणार आहेत, असे शहा यानी सांगितले.
2024 चा रणसंग्राम जे.पी.नड्डांच्याच नेतृत्वात, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा