Home Top News २४ ला रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव

२४ ला रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव

0

नागपूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव यंदा २४ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदानावर होणार असून प्रसिद्ध गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन हे यंदाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मुख्य भाषण होणार आहे.
रेशीमबाग मैदानावर सकाळी ७.४० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन निघणार आहे. कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया आणि महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी केले आहे.