Samrudhi Mahamarg समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

0

Samriddhi Highway Accident 

या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली. हा अपघात रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान जांबरगाव टोल नाका येथे घडला.

छत्रपती संभाजीनगर: बुलढाणा  Buldhana येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. samruddhi highway accident in chhatrapati sambhajinagar vaijapu  वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये चार महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे. तसंच अपघातात २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. खाजगी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवलं होतं. ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जोराची आदळली. Samriddhi Highway Accident  

हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार वर्षाचा चिमुकल्याचा देखील समावेश आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदतकार्य सुरू केलं असून घटनास्थळावरून जखमी रुग्णांना तात्काळ स्थानिक रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची गांभीरता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय सज्ज करण्यात आलं असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ट्रॅव्हल्समध्ये एकूण 30 जण करत होते प्रवास

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.

अपघातातील मृतांची नावं

तनुश्री लखन सोळसे ( वय 5 वर्षे, रा. समतानगर,नाशिक)

संगीता विलास आठवले (वय 40 वर्षे,वणसगाव, निफाड,नाशिक)

अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे, रा. राजूनगर नाशिक)

रतन जमधडे (वय 45 वर्षे, संत कबीर नगर नाशिक)

काजल लखन सोळसे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक)

रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक)

हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 वर्ष, उजगाव निफाड, नाशिक)

झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे, रा. राजूनगर नाशिक)

अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे)

सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे)

मिलिंद पगारे (वय 50 वर्षे, कोकणगाव ओझर, निफाड, नाशिक)

दीपक प्रभाकर केकाणे (वय 47 वर्षे, रा. बसमत पिपळगाव नाशिक)

स्थानिक आले मदतीला धावून…

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.

मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश…

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच काही महिला देखील या अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर सर्व जखमी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.