मणिपूर हिंसाचार प्रकरणी 3 महिला न्यायाधीशांची समिती

0

 

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दुपारी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर मध्ये मदत व पुनर्वसनाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या तीन महिला न्यायाधीशांची समिती स्थापन केली आहे.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या या समितीने मणिपूरला जाऊन मदत आणि पुनर्वसनाचे काम पाहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल या समितीच्या प्रमुख असून न्या शालिनी जोशी (निवृत्त) आणि न्या.आशा मेनन (निवृत्त)
या समितीच्या अन्य दोन सदस्य आहेत