यवतमाळ -अडीच वर्षाच्या मविआला भ्रष्टाचाराला लोक कंटाळले होते बाळासाहेब ठाकरेच्या विचारांशी प्रतारणा होत होती. म्हणून सगळे जण कॉग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करत उध्दव ठाकरेंना सोडून हिंदुत्वाच्या विचारासोबत आले. मविआच्या भ्रष्टाचाराला कंटाळून उठाव करून आले. त्यामुळे युतीचे सरकार बनले असा दावा भाजप खा अनिल बोडे यांनी केला.
शिंदे सत्तेत आले भाजप पण सत्तेत आली. भाजप-शिवसेना एकमेकांना पूरक आहेत. भाजपच्या 105 आमदारांनी आणि जनतेने हे सगळं स्वीकारले, त्यामुळे हे सरकार दिसतंय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे लोकांच्या भल्यासाठीचे काम अनुभवायला मिळत आहे.
कालच्या जाहिरातीचा विषय संपला आहे. भाजपचे कार्यकर्ते जनता याच्या मनातले मी बोलून दाखवले.अगोदरच्या शिवसेनेत संजय राऊत नावाची व्यक्ती होती. ज्यांनी शिवसेना बरबाद केली.शिवसेना आणि भाजप मध्ये वितुष्ट आणणारी आधी जशी संजय राऊत ही व्यक्ती होती आताही तशीच कुणीतरी व्यक्ती तसेच वितुष्ट आणत आहे, त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आता शिवसेनेची आहे.