चार दिवसांत ४८ लाख महिलांनी केला एसटी बसमधून प्रवास

0

मुंबई: राज्य सरकारने या अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट दिली आणि राज्यातील एसटी बसगाड्यांमध्ये महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली असून चार दिवसात राज्यभरात तब्बल 48 लाख महिला प्रवाशांनी अर्ध्या तिकिटावर प्रवास केल्याची आकडेवारी पुढे आली आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एसटी प्रवासात सुट देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी देखील आठवडाभरात करण्यात आली. या सवलतीमुळे महिलांना प्रवासाबद्धल कमालीचा उत्साह दिसत असून एक बसस्थानकांवर महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. राज्यभरात हेच चित्र दिसून आले. साधी बस असो की शिवशाही या गाडीमध्ये अर्धे तिकीट आकारले जात असल्यामुळे महिला प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या 75 वर्षावरील नागरिकांना मोफत आणि आता महिलांना 50 % तिकीट सवलत दिली जात आहे. या खर्चाची प्रतीपूर्ती राज्य शासन करते आहे.