अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकरांच्या भाषणाकडे साहित्य रसिकांची पाठ

0

वर्धा :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अध्यक्षीय भाषण करताना शामियान्यातील 90% खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र दिसल्याने मराठी रसिकांनी या साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली का, असा प्रश्न निर्माण झाला. नियोजित कार्यक्रमानुसार संमेलनाचे सकाळी उद्घाटन झाल्यानंतर साडेचार वाजता संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे भाषण आणि त्यावर चर्चा अपेक्षित होते. मात्र,लोक भाषण ऐकण्यासाठी आले नाहीत,त्यामुळे भाषण उशीर सुरू करण्यात आले तरी वर्धेकरांनी संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाकडे पाठ फिरवली.

वर्धा येथील स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात साहित्‍य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी साहित्‍य नगरी सजली आहे. साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्‍यासपीठावर मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. साहित्य ग्रंथ दिंडी उदघाटन सत्रात चांगली गर्दी होती मात्र, संध्याकाळ होता-होता वर्धेकरांसोबतचं साहित्य रसिकांचा उत्साह ओसारल्याचं चित्र बघायला मिळाले. सायंकाळी तर डॉ रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखालील परिसंवादात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. लाईट, पंखे बंद झाल्याने राज्य शासनाचे 2 कोटी आणि लोकप्रतिनिधीसह कोट्यवधींची मदत मिळाल्यावरही गाजावाजा बराच झालेला असलेल्या आयोजनात नियोजनाचा अभाव अनेक ठिकाणी दिसला. लोकसहभाग मिळेल असे कार्यक्रम नसल्याने लोकांनी पाठ फिरवल्याची चर्चा कानी पडली.

 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गोंधळ

18 लोकांवर गुन्हे दाखल

वर्धा-विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षा निमित्त वर्धा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना काही विदर्भाद्यांनी पत्रक फेकून, बॅनर फडकवत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आंदोलकांना ताब्यात घेतले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. शिंदे यांचे भाषण संपत असताना पुन्हा काही विदर्भवादी महिलांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले.याप्रकरणी 18 लोकांवर गुन्हे वर्धेच्या रामनगर पोलिस ठाण्यात कलम 188 आयपीसी आणि 135 मुबंई पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा