भाजप-शिवसेनेत समन्वयासाठी समिती स्थापन होणार

0

मुंबई mumbai -भाजप व शिंदे shinde group  गटात समन्वय राखण्यासाठी दोन पक्षांची समन्वय समिती स्थापन होणार असल्याचे संकेत शिंदे गटातील मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. (Co-ordination Committee for BJP-SS Alliance) शिंदे गटाकडून प्रसारित जाहीरातीमुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. eknath shinde 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगळवारी प्रसारित जाहिरातीने भाजप व शिंदे गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपने त्याची गंभीर दखल घेतल्यावर शिंदे गटावर ‘डॅमेज कंट्रोल’ करीत सुधारित जाहिरात जारी करण्याची पाळी आली. “केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात एकनाथ शिंदे” अशी टॅगलाईन असलेल्या जाहिरातीत राज्यात मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय असल्याचे दाखविण्यात आले. आता भाजपने तीव्र नाराजी दर्शविल्यावर दोन्ही पक्षांनी भविष्यातील वाद टाळण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.