गडकरींना धमकी देणारा कुख्यात गुंड

0

बेळगावच्या तुरुंगातून केला होता फोन ; आरोपी गँगस्टर आणि खुनाचाही आरोपी


नागपूर. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari ) यांच्या कार्यालयात १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल (Extortion phone call ) आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. १०० कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणू अशीही धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. दरम्यान, ही धमकी कर्नाटकमधील बेळगावच्या तुरुंगातून (Belgaum Jail in Karnataka ) देण्यात आल्याचे समोर आले आहे. धमकी देणाऱ्या तुरुंगातील व्यक्तीचे नाव जयेश कांता असे आहे. याबाबत नागपूर पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तरुंगातून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जयेश कांता असे आहे. हा आरोपी कुख्यात गुंड असून त्याच्यावर खुनाचा आरोप आहे, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात शनिवारी (१४ जानेवारी) धमकीचे फोन कॉल्स आले होते. दाऊद इब्राहीम टोळीचा सदस्य असून १०० कोटी रुपये द्या अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी या फोनद्वारे देण्यात आली होती. धमक्यांच्या फोननंतर गडकरी यांचे निवासस्थान तसेच कार्यालयावरील सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत कॉल ट्रेस केला होता. हा फोन कॉल बेळगामधून आला होता, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथकही कर्नाटकमध्ये रवाना झाले होते.


तिथे जाऊ आरोपी जयेश कांथाची माहिती घेण्यात येत आहे. त्याने अवैधरित्या फोनचा वापर केला आणि गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याची माहिती पुढे येत आहे. बेळगाव तुरुंग प्रशासनाने आरोपीकडील एक डायरी आपल्या ताब्यात घेतली आहे. तसेच नागपूर पोलिसांनी आरोपीसाठी प्रोडक्शन रिमांड मागितली आहे. या प्रकरणी आरोपीची पुढील चौकशी करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याला महाराष्ट्रात आणले जाणार आहे.

धमकीचे पाठोपाठ तीन फोन


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील खामला चौकात ऑरेंजसिटी हॉस्पीटलसमोर जनसंपर्क कार्यालय आहे. शनिवारी त्यांच्या या कार्यालयात धमकीचे फोन आले. कार्यालयात सकाळी ११.२९ वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. दुसरा फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन हा १२.३२ वाजता आला. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा