नेपाळमध्ये विमान अपघात, ७२ प्रवाशांसह विमान कोसळले

0

पोखराजवळ घटना ; मदतकार्य सुरू


काठमांडू. नेपाळमध्ये विमानाचा मोठा अपघात (plane crash in Nepal ) झाला आहे. नेपाळमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पोखराजवळ प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या विमानात ७२ प्रवासी असल्याची माहिती (there are 72 passengers in the plane) पुढे येत आहे. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्याला सुरुवात (Relief work is underway ) करण्यात आली आहे. राजधानी काठमांडूहून विमान पोखराला जात होते. अपघातग्रस्त विमान यति एअरलाईन्सचे आहे. या घटनेचे व्हीडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहेत. त्यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. या भीषण अपघातातून कुणाचाही बचाव अशक्य मानले जात आहे. पण, गरजुंना मदत मिळावी यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहे. बचाव पथक आगीवर नियंत्रण मिळवून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. या अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.


यति एअरलाईन्सचे ATR-72 विमान पोखराजवळ कोसळले. या ७२ आसनी विमानाने काठमांडूहून उड्डाण केले होते. विमानात चार कर्मचाऱ्यांसह एकूण ७२ जण होते. पोखराजवळ पोहोचताच विमानाला अपघात झाला. पर्वतीय भागात विमान कोसळले. जुना विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती नेपाळी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. . क्रॅश होताच त्यात मोठा स्फोट होऊन ते पेटले. आगीमुळे प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचण येत आहे. हा अपघात एका नदीच्या किनारपट्टी भागात झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
विमानात ६८ प्रवासी आणि ४ कर्मचारी असल्याचे यति एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले. खराब हवामानामुळे विमानाला अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विमान अपघातग्रस्त होऊन नदीत कोसळले. दुर्घटनाग्रस्तस्थळी सध्या मदतकार्य सुरू आहे.

पावभाजी आणि कडबोळी | Kadboli -secret reciepe, Pavbhaji Recipe |Shankhnaad Khaddya Yatra Ep.no. 71