जिल्हा संघचालक यांना मारहाण प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

0

वर्धा – बसने प्रवास करीत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर खाली उतरवीत आठ ते दहा युवकांनी एकत्र येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण केली. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस यांनी त्या युवकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ही जी घटना आहे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी असल्याचे सुद्धा यावेळी खासदार तडस यांनी म्हटले आहे.