अमरावती : आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार कामगार पक्षाच्या वतीनं अमरावती समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी झोप काढो आंदोलन करत समाज कल्याण विभागाचा निषेध केला.अमरावती विभागातील BVG कंपनी मार्फत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना शासन मान्य सुरक्षा मंडळात नोंदणीत करण्यात यावी व BVG कंपनी हटवा ही मागणी करण्यात आली. कारण समाज कल्याण कार्यालयावर BVG कंपनी मार्फत पुरवल्या जाणारे सुरक्षा रक्षक यांची कंपनी सोबत समाज कल्याणचे साटेलोटे असल्याचा आरोप प्रहार कामगार संघटनेचे वतीने करण्यात आला यावेळी कार्यालया समोर झोप काढो आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.