Home Artical Blog नागपूर रोडवरील विस्कळीत वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणविरोधात एक पाऊल

नागपूर रोडवरील विस्कळीत वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणविरोधात एक पाऊल

0

जनता कॉलेज चौकात नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तसेच नागपूर रोडवरील (वडगाव प्रभाग) वरोरा नाका चौक ते मनोहर वाइन शॉपी परिसरातील दिवसेंदिवस विस्कळीत होत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत उपाययोजना करण्यासाठी माननीय पोलिस निरीक्षक (वाहतूक) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाहतूक समस्या, रस्त्यावरील अतिक्रमण, अवैध पार्किंग आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी वडगाव प्रभागाचे नगरसेवक श्री. अजय बलकी, सौ. मनिषा बोबडे, श्री. अनिल काळे, प्रा. रविकांत वरारकर, श्री. विपिन देऊळकर आदी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले :

▪️ दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत वाहतूक शाखेकडून वरोरा नाका चौक ते मनोहर वाइन शॉपी परिसरात विशेष गस्त घालण्यात येईल.
▪️ गस्तीदरम्यान ट्युइंग वाहन सोबत राहील व रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
▪️ नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर चालनाची कारवाई केली जाईल.
▪️ जनता कॉलेज चौक व गजानन महाराज चौक येथे ट्रॅफिक पोलिस रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तैनात राहतील.
▪️ वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांची तक्रार नागरिकांना करता यावी यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.

याशिवाय नागपूर रोडवरील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग (NH), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच चंद्रपूर महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून आवश्यक सुधारणा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुकर वाहतुकीसाठी प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.