वंचितच्या वतीने मोदी सरकारविरोधात लाक्षणिक आंदोलन

0

 

बुलढाणा : मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सरकारला नऊ वर्षापेक्षा जास्त वेळ होऊनही अजून रोजगाराचा गंभीर प्रश्न कायम आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने बिरबलची खिचडी कधी शिजत नाही ती कोणाच्या ताटातही जात नाही तसे मोदी सरकार असल्याची टीका करीत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मोठ्या प्रमाणात वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर हे बेकार असून त्यांना इतर व्यवसाय करावे लागत असल्याचे प्रतीकात्मक देखावे देखील यावेळी साकारण्यात आले होते.