शिवाजी विज्ञान महाविद्यालयात ‘आयसीटी आणि कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

0

 

नागपूर :श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित विज्ञान महाविद्यालय नागपूरच्या वतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे 125 वे जन्म वर्ष व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष निमीत्याने दिनांक 27 28 मार्च दरम्यान ‘आयसीटी आणि कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरातील जवळपास 300 पेक्षा अधिक नामांकित शैक्षणिक संस्थेचे प्रतिनीधी यासाठी येत असून आयसीटी क्षेत्रातील वैज्ञानिक संचालकांना भेटण्याची संधी विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक यांना मिळणार आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभामध्ये प्रा. राजीव व्ही. धारस्कर, संचालक, इंडियन इन्स्टिीटयुट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (IIT) कोटटायम, केरळ हे बीजभाषण करतील. विविध सत्रांमध्ये 160 शोधनिबंध सादर करणार आहेत.
निमंत्रितामध्ये प्रा. मनुप्रताप सिंग, संचालक इन्स्टिीटयुट ऑफ इंजिनीअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा हे असतील. प्रा. रमेश मांझा, प्राध्यापक, संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, औरंगाबाद, डॉ. सागर जांभोरकर, संगणकशास्त्र विभाग, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पूणे, प्रा. व्हि. एम. ठाकरे, माजी प्राध्यापक आणि विभागप्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, अमित काळे असोसीएट व्हाईस प्रेसिडंट, ग्लोबल लॉजीक आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

 

 

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा