वर्धा : बनावट नोटांच्या चलनाचा वर्धा पोलिसांनी पर्दाफाश केला असून शहरात बनावट नोटा चलन करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. तपास सुरू असताना दिल्ली येथील व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक लॅपटॉप दोन कलर प्रिंटर,मोबाईल व बनावट नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, डॉ. सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक, बाबुराव सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये सत्याविर बंडीवार पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशांवर सलाम कुरेशी पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार दिनेश तुमाने जगदीश गराट अनुप राऊत पोलीस शिपाई राहुल भोयर, नितीन इटकर व सी.आय यु युनिटचे प्रमुख संदीप काकडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मडावी व पोलीस शिपाई अंकित जीभे यांनी केली आहे.
https://youtu.be/TV-oUaE3-c8