अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीमध्ये हिंदू शेरणीचे मोठे बॅनर लागले आहेत या पोस्टरवरून त्यांच्या जन्मतारखेच वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ,या पोस्टरवर 6 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व खा.नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त सामूहिक हनुमान चलीसा पठन असल्याचा उल्लेख आहे.
मात्र 6 एप्रिलला जर खा.नवनीत राणा यांचा वाढदिवस असेल तर त्यांची जात ही शीख आहे. तसा उल्लेख त्यांच्या टीसी वर आहे व ज्या टीसीच्या भरोवशावर त्यांनी लोकसभा लढवली. जातीच्या टीसी त्यावर जन्म तारीख15.4.85 आहे. त्यामुळे त्यांची जात ही मोची आहे. त्यामुळे त्यांची कोणती टीसी खरी आहे? जर 6 तारखेला वाढदिवस असेल तर मग तुम्ही शीख आहेत का?मग तुम्ही मागासवर्गीय मतदार संघातून निवडणूक कशा लढल्या असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी उपस्थित केला आहे.