भंडारा : भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर परिसरात एका ४७ वर्षीय मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करून तिला तिथेच सोडुन दिल्याचा प्रकार दि.३० एप्रिल रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी भंडारा पोलीसात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार नोंदवुन तपास सुरू होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात भंडारा पोलीसांना यश आले आहे.
बसुराज पंढरी नंदेश्वर असे अत्याचार करणार्या आरोपीचे नाव असुन तो ऑटोचालक आहे. पिडीत महिलेची प्रकृती स्थिर असुन तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.