महाविकास आघाडीला माझ्याकडुन तडा जाणार नाही – उध्दव ठाकरे

0

मुंबई : मविआला तडा जाईल असं राष्ट्रवादीत काही होणार नाही. माझी मतं मी ठामपणे मांडलेली आहेत असे शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रत्येक पक्षाला व्यस्थापन करण्याचा अधिकार असतो. प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे पण ह्यावर मला जास्त बोलावे असे वाटतं नाही.
कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला माझ्याकडुन तडा जाणार नाही याची मी काळजी घेईल. मी व्यक्तीचा पराभव कधीच करायला मागत नाही, वृत्तीचा पराभव करायला मागतो. हुकूमशाही चा पराभव करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांच्या पक्षांतंर्गत बदल करण्याचा शरद पवार यांना अधिकार आहे. हिंदुत्वाचा प्रचार केला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडुन मतदानाचा अधिकार काढून घेतला. कर्नाटक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणाले आहेत की, मतदान करताना बजरंग बली की जय बोलत मतदान करा. आता मी आव्हान करत आहे मराठी माणसाच्या एकजुटीला
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी बोलत मतदान करा. आता मतदारांनी ठरविले पाहिजे मराठी भाषेचे हिताचे राजकारण करत मराठी उमेदवारांना मतदान करा. देशात तानशाही यायला नको त्यामुळे आम्ही एकत्र येऊ लागलो आहे. आम्ही वज्रमुठेचा कार्यक्रम मे शेवट पर्यंत ठरविला होता
पण खारघरला जे घडलं त्यामुळे ह्या सभा थांबवून पुन्हा सुरु करणार. मी माझ्या लोकांना भेटायला जात आहे. मला हिंमत वगैरे सांगू नका. तुम्ही उपऱ्यांची सुपारी घेऊन येत आहे. माझ्या परिवारांवर तुम्ही उपऱ्यांमुळे येत आहे का, मला अडवण्यापेक्षा लोकांमध्ये जा आणि त्यांचे प्रश्न ऐका,बारसूच्या जागेवर माझ्यावर आग्रह होता पण मला हे मान्य होतं की तिथल्या लोकांनी जर होकार दिला तरच करता येईल असेही ठाकरे म्हणाले.