केंद्राचे प्रेम उफाळले, तर प्राणीसंग्रहालयाकडे दुर्लक्ष
नागपूर. राज्यातील हत्ती, उद्योगांच्या पाठोपाठ आता वाघ आणि बिबट्यांनाही (Elephants, followed by industries, now tigers and leopards) गुजरातला (Gujarat) पाठविण्यात येत आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील (Gorewada Rescue Centre ) चार वाघ आणि चार बिबट शनिवारी गुजरातला रवाना झाले. वाघ आणि बिबटे मिळावे म्हणून दोन ते तीन वर्षांपासून केंद्रीय प्राणिसंग्रहालयाला अर्ज केलेल्या देशातील दहा ते अकरा प्राणिसंग्रहालयांना हिरवी झेंडी न देता आठच दिवसात गुजरातला हे प्राणी पाठवण्यात आले. यामुळे प्राण्याच्या प्रतीक्षेतील इतर प्राणी संग्रहालयांच्या तोंडाला पाने पुसल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी गोरेवाडा प्रकल्पातून दोन वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी पाठविण्यात आले. मात्र, हे वाघ नेताना गुजरातच्या जामनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील काही अधिकारी गोरेवाडा प्रकल्पात आले होते. ही बाब भूवया उंचावण्यास भाग पाडणारी आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी वाघ नेले जात असताना गुजरातच्या या खासगी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे अधिकारी तेथे होते. त्यांनी गोरेवाडा प्रशासनाच्या रेस्क्यू सेंटरकडे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी नसताना जामनगर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघ, बिबट्यांची मागणी केली होती. मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), राज्य सरकार आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालयाची परवानगी नसल्याने त्यांनी वन्यप्राणी देण्यास नकार दिला होता.
तीनच दिवसात हलले सूत्र
जामनगर येथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना तसा निरोप दिला. केंद्र सरकारचे सूत्र हलताच तीनच दिवसात केंद्रीय प्राणी संग्रहालयासह राज्यशासन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानग्या गोरेवाडा प्रशासनाला देण्यात आल्यात. कायद्याच्या चौकटीत राहून गोरेवाडा प्रशासनाने वन्यप्राणी देण्यास होकार दिला. दोन दिवसांपूर्वी चार वाघ आणि चार बिबट गुजरातकडे रवाना झाले. तब्बल दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्जाला केराची टोपली दाखवली. तीनच दिवसात गुजरातमधील जामनगरच्या पारड्यात प्राणी संग्रहालायने वजन टाकल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. या प्रकारावर वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.