धमकीनंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी गृह विभागाला केले लक्ष्य

0

 

अमरावती- आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संभाजी भिडे संदर्भात असेच बोलत असाल तर दाभोळकर करू असा इशारा दिला गेला आहे.दाभोळकर असाच ओरडत होता. एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला.हरामखोर बाई कोण आहे? स्पष्ट करा म्हणत, यशोमती ठाकूर यांना दाभोळकर करण्याची धमकी दिली गेली आहे. दरम्यान, आम्हाला मारून टाकायचे असेल तर मारून टाका, पण आम्ही याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. यामागे जे सत्ताधारी आहेत, त्यांचा हात आहे.माझ्या जिवाला जर काही झालं तर त्याला जबाबदार होम डिपार्टमेंट राहिल असा इशारा आ यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.