
कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्या बीआरएसते प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या १ ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये येणार आहेत. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. याशिवाय ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जाणार आहेत.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी दुपारी के चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूर मधील अंबाबाईच्या दर्शनासाठी चंद्रशेखर राव हे जाणार असून तेथून ते हैदराबादला परत जातील,अशी माहिती बीआरएसच्या सूत्रांनी दिली.