शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर मनसेचे आक्रमक आंदोलन, कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे केले पींडदान

0

नागपूर : विदर्भात मुसळधार पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS Demonstration against Insurance Company) आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालय बंद असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला हार घालून तेथेच पीक विमा कंपनीच्या नावाने पिंडदान केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा, एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष दुरुगकर हे सोमवारी कार्यकर्त्यांसह पीक विमा कंपनीच्या कार्यालयात गेले. मात्र, कार्यालय बंद होते. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वर्ग चकरा मारत आहे. मात्र, कार्यालयच बंद राहात असल्याने त्यांचा नाईलाज होत आहे. आणेवारीच्या नावाखाली कंपन्यांकडून अडवणूक होत आहे. यासंदर्भात अनेकदा तहसीलदार व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, त्यानंतरही काहीच हालचाली होत नसल्याने मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांच्या नेतृत्वात मनसेने तेथेच आंदोलन सुरू केले. विमा आंदोलनात सचिन चिटकुले, प्रभारी जिल्हा उपाध्यक्ष रितेश कान्होलकर, अनिलजी नेहारे, दिपक ठाकरे, साहिल ढोकणे, तन्मय तेलरांधे, महेश शाहु, तुषार भुबर, राहुल वेले, स्वाती जयस्वाल, वैष्णवी चिंचोळकर, अंजनाबाई महाजन, लता वाघमारे, मंदा चानपुरे, आकाश पिरोडीया, गोपाल ठोसर, अतुल कांबळे, आश्विन पुंडे, राकेश चौधरी, मुकेश मुंडले, प्रीतम कम्पलीवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा