राज्यस्तरीय विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा औरंगाबाद येथे

0

विभागीय स्तरावरील विजेत्या खेळाडूंसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन

नागपूर : आगामी राज्यस्तरीय विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा औरंगाबाद येथे होणार आहेत. विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनी विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ही माहिती दिली. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांची या स्पर्धेतील कामगिरी लक्षणीय ठरली. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याला सांघिक विजेतेपद मिळाले. सांघिक गटात गडचिरोलीने क्रिकेट, कबड्डी, खो-खो (पुरुष), खो-खो महिला , व्हॅालिबॅाल, थ्रो बॅाल (महिला) तर फुटबॅाल मार्च पास्ट आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नागपूरने अव्वल स्थान पटकावले. तर सांघिक गटात चंद्रपूरने दुसरे तर नागपूरने तिसरे स्थान पटकावले.
वैयक्तिक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतही गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा तपशील पुढीलप्रमाणे –
मैदानी क्रीडा स्पर्धेचा निकाल
पुरुष (४५ वर्षाआतील)
१०० मीटर धावणे – प्रथम प्रणय कापगते (गोंदिया), द्वितीय अमोल फेंडर (भंडारा), तृतीय निशांत दोनाडकर (गडचिरोली)
२०० मीटर धावणे – प्रथम प्रणय कापगते (गोंदिया), द्वितीय अमोल फेंडर ( भंडारा), तृतीय विनोद मुंडे ( नागपूर)
४०० मीटर धावणे – प्रथम खिलेंद्र गव्हर्णा (गडचिरोली), द्वितीय राकेश काम (नागपूर), तृतीय सतीश मिरकत (चंद्रपूर)
४०० बाय १०० रिले – प्रथम दिलीप वाचामी (गडचिरोली) सचिन कन्नाके, प्रवीण मडावी, प्रदीप नरोटे (गडचिरोली), दितीय प्रमोद बावणे, लीलाधर कापगते, अशोक बघेल, प्रणय कापगते (गोंदिया), तृतीय राजेश ठाकरे, अमोल फेंडर, अमित बावणकर, शशिकांत आखरे (भंडारा)
गोळाफेक – प्रथम रमज्योत सिंग (प्रथम) गडचिरोली, द्वितीय वैभव पवार (भंडारा), तृतीय कपिल घोरपडे (गोंदिया)
थाळीफेक – रणज्योत सिंग (प्रथम), द्वितीय देवेंद्र तिडके (गोंदिया),तृतीय रवींद्र राठोड (नागपूर)
भालाफेक – मनथोस विश्वास (गडचिरोली), दितीय सागर झाडे ( वर्धा), तृतीय कपिल घोरपडे (गोंदिया)
लांब उंडी – संदीप जिभकाटे (नागपूर), दितीय विनायक नंदनवार (भंडारा), तृतीय दिनेश पुजारी (चंद्रपूर)ॉ
उंच उडी – प्रथम साधू मट्टानी (गडचिरोली) दितीय संदीप जिभकाटे (नागपूर), तृतीय विनायक नंदनवार (भंडारा)
४ बाय ४०० रिले – खिलेंद्र गव्हर्णा, निशांत दानोडकर, इमलेश जेमटे, दिलीप वाचानिक ( गडचिरोली), दितीय चंद्रशेखर मादनेलवार, दिलीप कोटनाके, नितेश राठोड, सागर कोडापे (चंद्रपूर), तृतीय अनुप वारके, प्रवीण ठाकरे, संदीप तिवारी, विनोद मोढे (नागपूर जिल्हा)
मैदानी क्रीडा स्पर्धेचा निकाल (पुरुष)
तीन हजार मीटर चालणे – प्रथम अनंत मेश्राम (नागपूर) द्वितीय पी.एस.कापगते (गोंदिया), तृतीय विजय भसारकर (चंद्रपूर)
गोळाफेक – प्रथम प्रकाश चव्हाण (गोंदिया), दितीय खुशाल मस्के (चंद्रपूर), तृतीय पद्माकर वाघ (वर्धा)
थाळीफेक – प्रथम खुशाल मस्के (चंद्रपूर), दितीय परदुमन काटंगे (गडचिरोली), तृतीय एन.जी.मेश्राम (भंडारा)
भालाफेक – प्रथम सुनील दिवसे (गडचिरोली) एन.जे.मेश्राम (भंडारा), तृतीय पद्माकर वाघ (वर्धा)
मैदाना स्पर्धेचा निकाल महिला ४५ वर्षाखालील
शंभर मीटर धावणे – प्रथम स्नेहा टोहलिया (गडचिरोली) दितीय मनिषा मते (चंद्रपूर), तृतीय अर्चना देशमुख (भंडारा)
२०० मीटर धावणे – प्रथम मनिषा मते(चंद्रपूर), द्वितीय माधुरी गावडे ( गडचिरोली), तृतीय संजना भगत (नागपूर)
४०० मीटर धावणे – प्रथम लता मुडेमा (गडचिरोली), द्वितीय मनिषा मते (चंद्रपूर), तृतीय स्नेहा मांडवगडे (गोंदिया)
४ बाय १०० मीटर धावणे – प्रथम लता मुडमा, कांता तलांडी, माधुरी गावंडे, सरिता मडावी (गडचिरोली ), द्वितीय स्नेहा तामगाडगे, मनिषा माटे, प्रणाली गजभिये, स्मिता बोरकुटे (चंद्रपूर), तृतीय एस.के.मांडवगडे, आर धमगाये, चंद्रकला राऊत, निराशा शंभरकर (गोंदिया )
गोळाफेक – प्रथम मनिषा कोरटी (गडचिरोली), द्वितीय वाकुबाई भगत (वर्धा), तृतीय निखात वेग (भंडारा)
थाळीफेक – प्रथम वनिता भोंगाटे (गडचिरोली), द्वितीय एन.आर. शंभरकर (गोंदिया), तृतीय शिल्पा डोंगरे (भंडारा)
भालाफेक – प्रथम सुजाता मळावी (गडचिरोली), द्वितीय सुजाता उईके (वर्धा), तृतीय चैताली मानकर (गोंदिया)
लांबउडी – प्रथम कांता तलांडी (गडचिरोली), द्वितीय रोशनी कोमळकर (वर्धा), तृतीय एस.के.मांडगवडे (गोंदिया)
उंचउडी – प्रथम प्रणाली गजभिये (चंद्रपूर), द्वितीय कविता राखडे (भंडारा), तृतीय – निरंक
४ बाय ४०० मीटर धावणे – प्रथम लता मुंडमा, कांता तलांडी, काजल तुमरेडी, सरीता मडावी (गडचिरोली), द्वितीय प्रणाली गजभिये, मनिषा मते, स्नेहा तामगाडगे, स्मिती बारकुटे (चंद्रपूर), तृतीय स्नेहा मांडवगडे, रजनी धामगाये, चंद्रकला राऊत, हसरेखा बोरकर (गोंदिया)
मैदानी क्रीडा स्पर्धाचा निकाला महिला 45 वरील
गोळाफेक – प्रथम रमुला गुरभेलीया (गडचिरोली), द्वितीय सुमन कराळे (नागपूर), तृतीय सुजाता उईके (वर्धा)
थाळीफेक – प्रथम रमुला गुरहिया (गडचिरोली), द्वितीय सुजाता उईके (वर्धा), तृतीय विमला थोटे (भंडारा)
भालाफेक – प्रथम रमलाबाई गुरभोलीया (गडचिरोली), द्वितीय सुमन कराळे (नागपूर), तृतीय लता लोंढे (वर्धा)
3000 मी चालणे – प्रथम विद्या नायडु (चंद्रपूर), द्वितीय यमुना मंढरे (गडचिरोली), तृतीय देवला पंचबुधे (भंडारा)
सांस्कृतिक स्पर्धा
एकल गायन महिला – प्रथम स्नेहा मांडवगणे (गोंदिया), द्वितीय वंदना सवरंगपते (नागपूर), एकल गायन(पुरुष)- प्रथम राहुल कलांडे (गडचिरोली), द्वितीय विनोद अवझे (नागपूर), युगल गायन – प्रथम प्रिती डुडुलकर व नंदकिशोर कुंभरे (चंद्रपूर), द्वितीय आभा वाघमारे व अजय व्यास (नागपूर), समूह गीत- प्रथम नितीन मडावी व चमू (चंद्रपूर), द्वितीय रवी भवसागर व चमू (भंडारा), अभिनय एकपात्री- अविनाश (गडचिरोली), प्रिती हुडुलकर (चंद्रपूर) एकल नृत्य – प्रथम धनश्री कन्नाके (चंद्रपूर), द्वितीय अर्चना कडव (नागपूर) युगल नृत्य – प्रथम प्रतिभा पोटवार व केतकी मोहरील (नागपूर), द्वितीय प्रणाली दरडे व शलाखा म्हशाखेत्री (गडचिरोली) समूह नृत्य- प्रथम योगिता मडावी व चमु (गडचिरोली) द्वितीय विनिता रोठोड व चमु (वर्धा) वाटीका- प्रथम राजु धांडे व चमु (चंद्रपुर) द्वितीय ऐर्श्या गिरी व चमु (वर्धा) वेशभुषा- प्रथम नितीन पाटील व स्नेहा (चुद्रपुर), तामगाडगे, द्वितीय योगिता मडावी व चमु (गडचिरोली) नक्कल- प्रथम प्रशांत शेंडे (नागपूर) वादक प्रथम चिदानंद हिडाम ढोलकी (चंद्रपुर) द्वितीय श्रीकांत राऊत हार्मोनियम (वर्धा) निर्मिती- प्रथम नागपूर, द्वितीय गडचिरोली, दिग्दर्शिक- प्रथम चंद्रपुर, द्वितीय वर्धा कलाप्रकार- प्रथम पुजा गायकवाड व चमु (गोंदिया) द्वितीय नांदी (नागपूर) निवेदक- प्रथम प्रताप वाघमारे (नागपूर), द्वितीय अजय धर्माधिकारी (वर्धा)

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा