संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रकरणी ८ ला निर्णय-विधानसभाध्यक्ष नार्वेकर

0

मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ असल्याच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याची दोन दिवसांत चौकशी केली जाणार असून पुढील बुधवारी हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (privilege motion against MP Sanjay Raut) यांनी केली आहे. या प्रकरावर गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला. त्यावर भाजप व शिंदे गट आक्रमक झाला आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील नेत्यांनीही त्यांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त केली. राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. त्यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घडलेल्या प्रकारावर आपले मत मांडले. राऊत यांच्या वक्तव्याची दोन दिवसांत चौकशी करून पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु, असे नार्वेकर यांनी जाहीर केले. ही घोषणा करताना नार्वेकर यांनी सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही केली.
राहुल नार्वेकर यांनी राऊतांविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय दिल्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरूच होता. सत्ताधारी आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कोल्हापूर येथे बोलताना संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाले राऊत?
बुधवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असे म्हणत शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. बनावट शिवसेनेने पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असेही राऊत म्हणाले. बेळगाव प्रकरणी तुरुंगात गेल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी कागदपत्रे दाखवावीत, असे आव्हानही त्यांनी दिले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा