अजित पारसेवर अटकेचा टांगती तलवार

0

अटकपूर्व जामीन फेटाळला ; फसवसुकीचे प्रकरण


नागपूर. वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्याच्या बहाण्याने होमिओपॅथी डॉक्टरला साडेचार कोटींनी गंडा (Homeopathy doctor cheated by four and a half crores ) घालण्यासह मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अनेकांना सुमारे 20 ते 25 कोटींनी चूना लावणारा कथित सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला (Ajit Parse’s pre-arrest bail application was rejected by the court ) आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीविरुध्द प्रत्यक्ष सहभाग आणि रक्कमे बाबत देवाण घेवाण दिसत असल्यामुळे पारसेचा जामीन अर्ज खारीज व्हावा ही सरकार पक्षाची बाजू ग्राह्य धरुन आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पोलिस आता तरी त्याला अटक करतील काय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गुन्ह्यातील तक्रारदार डॅाक्टर राजेश मुरकुटे यांना मेडीकल कॅालेजची परवानगी प्राप्त करुन देतो, त्याच प्रमाणे सिबीआयकडून चौकशी सुरु असल्याचे बनावट सुचनापत्र तसेच बँकेची बनावट कागदपत्रे व्हॉटसअॅेपवर टाकून विश्वास संपादन करुन वेळोवेळी 4,36,50,000 रुपयांची फसवणूक केली. यानंतरही तो पैशांची मागणी करीतच होता. पारसेची न थांबणारी मागणी पुरवता येणे शक्य नसल्याने होमिओपॅथी डॉक्टरने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केल्याने सोशल मीडिया विश्लेषकाच्या आड असलेला लुटारू चेहरा समोर आला होता. पोलिसानी आरोपी अजित पारसेविरुध्द कलम 84, 420, 465, 467, 468, 471 भा.द.वि नुसार पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा दाखल झाला आणि सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.


अजित पारसे यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली असता राजमुद्रा असलेले शिक्के, पोलीस, बॅक, पोलीस स्टेशन, आयकर विभागाचे शिक्के, तसेच शासकीय कार्यालयाचे बनावट सिल व शिक्के व सापडले होते.
सीएसआर अंतर्गत निधीचेही आमिष दाखवले


याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सोशल मीडिया विश्लेषक व सायबर तज्ज्ञ अजित गुणवंत पारसे (वय 42 भेंडे ले-आऊट) यांच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 मध्ये होमीओपॅथी डॉक्टर असलेल्या राजेश मुरकुटे यांची नातेवाईकाच्या माध्यमातून पारसेंसोबत ओळख झाली. होमिओपॅथी कॉलेज सुरू करायचे असल्याचे डॉक्टरने पारसेला सांगितले. पंतप्रधान कार्यालयात ओळख असून, कॉलेज सुरू करण्यासाठी तुम्हाला ट्रस्ट स्थापन करावा लागेल, असे पारसेने सांगितले. त्यानंतर त्यांनी ट्रस्टसाठी चार नावे सूचवली. यापैकी एक नाव नीती आयोगातर्फे आपल्याला मिळू शकते. तसेच सीएसआरअंतर्गत निधीही मिळूवन देण्याचे आमिष त्याने डॉक्टरला दाखविले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा