पतीने घातला होता दुसऱ्या लग्नाचा घाट

0

पहिली पत्नी मुलासह पोचली थेट मांडवात, मग झाले काय वाचाच…


भंडारा. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच पती दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाच्या तयारीत (husband was trying for a second marriage) होता. पती पुन्हा लग्न करीत असल्याची माहिती मिळताच ती विवाह सोहळ्यात पोहचली (wife arrived at the wedding ceremony). पतीच्या दुसऱ्या लग्नाचा डाव मोडून काढत त्याच्या मनसुब्यांवर पाणी लोटले. नवरोबा आणि पहिली पत्नी दोघेही भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील असून दुसरे लग्न मुंबईच्या कल्याण (Kalyan of Mumbai) पूर्वेतील दर्शन विवाह सभागृहात होणार होते. पण, त्यापूर्वीच पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून खेमराज बाबुराव मूल (४०) रा. मासळ, लाखांदूर तालुका याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला मांडवातूनच ताब्यात घेतले. या प्रकारामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची एकच तारांबळ उडाली आणि त्यांना आल्यापावली परतावे लागले. मासळ भागातील गावांमध्ये सध्या याच घटनेची चर्चा आहे.
खेमराज पेंटचा व्यवसाय करतो. १५ वर्षांपूर्वी प्रेमसंबंधातून गावातीलच मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. काही दिवस पत्नीसोबत गोडीगुलाबीने राहिला. त्यांना 13 वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात बेबनाव सुरू झाला. पत्नीविरोधात घटस्फोटाची केस न्यायालयात दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात असतानाच दुसऱ्या लग्नाची तयारी चालवली. पत्नीला हा प्रकार कळला. लग्नाची तारीख माहीत करून घेत पतीचा डाव उधळण्यासाठी ती विवाहस्थळी मुलगा, भाऊ, बहिणीसह कल्याण (पूर्व) येथील दर्शन मॅरेज हॉलमध्ये धडकली. यातील वर-वधू लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज असताना पहिल्या पत्नीने पोलिसांच्या मदतीने लग्नाचा डाव उधळला. दुसरे लग्न करणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी खेमराज मुल याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कल्याणमधील (मुंबई) कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भादंवि ४९४, ५११, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निशा चव्हाण करत आहेत. प्रेमविवाह केल्यानंतर दुसरे लग्न करण्याचा डाव उधळल्याची महिती मासळ येथे समजताच एकच खळबळ उडाली.