-महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, नागपूर विभागाचे अधिवेशन
-12 ठरावांवर सूचना आमंत्रित
नागपुर (Nagpur ) :राज्यातील शिक्षण संस्था चालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत शालेय शिक्षण मंत्री (Minister of School Education) यांची भेट घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते (Ajit Pawar)अजित पवार यांनी आज दिले. त्यांच्या हस्ते कमला नेहरु महाविद्यालय, सक्करदरा चौक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, नागपूर विभागाच्या अधिवेशनाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन प्रसंगी अधिवेशनाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष, विजय नवल पाटिल विधानसभा सदस्य, नागपूर आ. (Sunil Kedar )सुनील केदार; विधान परिषद सदस्य नागपूर, (Sudhakar Adbale )आ. सुधाकर अडबाले; ओ.बी.सी. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, बबनराव तायवाडे; माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, सलिल देशमुख, आ. सुनील भुसारा, म.रा.शि.संस्था, महामंडळ नागपूर विभाग, अध्यक्ष अनिल शिंदे आणि म.रा.शि.संस्था, महामंडळ, नागपूर विभागाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस (Ravindra Fadnvis)यांची उपस्थिती होती. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष (Abhijit Wanjari) आ. अभिजित वंजारी होते.
विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेऊन शिक्षण संस्थांनी आपल्या सूचना आणि अडचणी तत्सम कारणासगट मांडाव्या आणि आपण शक्य तितके प्रयत्न करू आणि गरज पडल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री यांना देखील भेटू असे देखील अजित पवार म्हणाले, दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात खाजगी शिक्षण संस्था कार्यरत असून त्यांच्या अडचणी जाणून घेणे महत्वाचे आहे असे सांगतानाच राज्यस्तरावर आराखडा तयार नसताना नवीन शैक्षणिक धोरण अंमलबाजावणीत येणाऱ्या संभाव्य अडचणीबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष, (Vijay Navl Patil )विजय नवल पाटिल यांनी शिक्षण क्षेत्रातील आव्हानांकडे राज्य आणि केंद्र सरकारने वेळीच लक्ष देऊन विद्यार्थी हितासाठी सकारात्मक तोडगा काढण्याकडे लक्ष वेधले.
खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित आणि सरकारी अश्या विविध शिक्षणसंस्था यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या शिक्षणात बरीच तफावत आढळून येत असून गुणवतायुक्त शिक्षण प्रदान करण्यासाठी धोणार तयार करण्याची गरज आ. अभिजीत वंजारी यांनी बोलून दाखवली.
ततपूर्वी म.रा.शि.संस्था, महामंडळ, नागपूर विभागाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नता, पवित्र पोर्टल इत्यादीविषयी 12 ठराव प्रस्तावित केले. त्या प्रस्तावाविषयी त्यांनी सर्व उपस्थितांकडून सूचना मागविल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ -: ठराव :-
1. आधार कार्ड, विद्यार्थि संख्या संलग्न करण्यात याव्यात न करता संच मान्यता, 2. विद्यार्थि आधार कार्ड संलग्नते पायी कोणताही विद्यार्थि शाळाबाहय न करता संच मान्यता करण्यात याव्या 3. RTE प्रतीपुर्तता व इतर विद्याथी लाभ, आधार पुर्णता संलग्न न झाल्यामुळे थांबविण्यात येऊ नये, 75% आधार संलग्ता निर्णय स्थगीत करण्यात यावा. 4. विना अनुदानित, अंशता अनुदानित व नविन अनुदानावर येणा-या शाळांना आधार संलग्नता निर्णय लागु करू नये. 5. पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीस 1/10 उमेदवार निर्णय हा संस्थांच्या स्वायत्ते विरूद्ध असल्यामुळे रद्द करण्यात यावा. 6. पवित्र पोर्टल जिल्हा निहाय व विभाग निहाय करण्यात यावे. 7. थकीत वेतनेत्तर अनुदान व चालु वेतनेत्तर अनुदान सध्या लागु असलेल्या वेतनाप्रमाणे देण्यात यावे.8. वेतनेत्तर अनुदान निर्धारण निकष कालबाहय झाल्यामुळे कायद्यात बदल करण्यात यावेत. 9. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नेमणूका त्वरीत सुरू करण्यात याव्यात.10. वरीष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या. भरत्या सध्या अस्तीत्वात असलेल्या विद्यार्थि संख्येवर करण्यात याव्या. 11. NAC मुल्यांकण अनिवार्य करण्यात येऊ नये.12. मागास वर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क जुन्या पद्धतीने महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे..
दरम्यान अधिवेशनाच्या प्रारंभी ज्येष्ठ संस्थाचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात अशोकभाऊ जीवतोडे, (Chandrapur )चंद्रपूर; बाबुराव झाडे, नागपूर; अनिल पाटील म्हशाखेत्री, गडचिरोली (Gadchiroli ); जनाब शफिक अहमद, चंद्रपूर ; भाऊ गोस्वामी, भंडारा (Bhandara); राजाबाळ पाटील संगीडवार, सांगली; राधेलाल पटले, (Gondia )गोंदिया; शोभाताई काळे, वर्धा; सुधिरभाऊ भातकूलकर, गडचिरोली; हरीभाऊ दंडारे, वर्धा; राधेश्याम कापगते, भंडारा; बैस शिवनंदन सिंह रामसेवक, भंडारा यांचा समावेश होता.
उदघाटन सत्राचे प्रास्ताविक म.रा.शि.संस्था, महामंडळ नागपूर विभाग, अध्यक्ष अनिल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन म.रा.शि.संस्था, महामंडळ, नागपूर विभागाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस यांनी केले. सुरवातीला देवीसिंग शेखावत यांच्या निधनबद्दल २ मिनिट मौन पळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विद्यार्थ्यांना ‘प्रॉब्लेम सॉलवर’ बनविण्यावर भर – विकास गरड (Vikas Garad)
आगामी युग हे झटपट सोल्यूशन देऊ शकणाऱ्या लोकांचे असेल. त्यामुळे विद्यार्थी देखील फक्त पुस्तकात वाचून पेपर सोडवणारे नसतील. त्याना एकच प्रश्न चार वेगवेगळ्या पद्धतीने हाताळता आला पाहिजे. त्यांच्या वर अभ्यासाचे दडपण न येता त्यांचे एकूण व्यक्तिमत्व ‘प्रॉब्लेम सॉलवर’ बनविण्याकडे नविन शैक्षणिक धोरणात भर देण्यात आल्याचे मुंबई चे वक्ते विकास गरड यांनी सांगितले. अधिवेशनात ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि अंमलबजावणी’ या विषयावर चर्चासत्र झाले त्यात नवीन धोरण, त्यातील आव्हाने, चांगल्या बाबी, शिक्षकांची तयारी अश्या विविध गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या.