नागपूर: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal)यांना CBI ने चौकशी साठी बोलावल्यामुळे नागपुरातील संविधान चौकात आज रविवारी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. भाजप सरकार विरोधकाना येनकेन प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून सरकारच्या या दडपशाही धोरणाचा निषेध नोंदविला आहे. आम आदमी पार्टी (AAP) संयोजक देवेंद्र वानखेडे (Devendra Wankhede) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.