AJIT PAWAR वाढदिवस साजरा न करण्याचा अजित पवारांचा निर्णय

0

मुंबई MUMBAI रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी प्राणहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून अनेक जण मलब्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.Deputy Chief Minister Ajit Pawar has decided not to celebrate his birthday in the wake of a huge loss of life due to the collapse of houses at Irshalwadi in Mumbai-Raigad. It is reported that eight people have died in this accident so far and many people are feared to be buried under the debris. 

अजित पवार म्हणाले की, कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पुनर्उभारणीसाठी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा. राज्याचे प्रमुख घटनास्थळी दाखल झाल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. मातीची ढिगारे उचलण्यासाठी आता माणसांशिवाय पर्याय नाही. मदतकार्यासाठी तिथे ५०० – ७०० माणसे पोहोचली आहेत. अजून काही माणसं पाठवली आहेत. ठराविक काळात हे काम करावे लागणार आहे. आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत, ते म्हणाले.