नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी जामीन मिळाला (MP Brij Bhushan Singh ) आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने त्यांना गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केलाय. न्यायालयास माहिती दिल्याशिवाय परदेश दौऱ्यावर जाता येणार नाही, अशी स्पष्ट अट त्यांना घालण्यात आली आहे. १८ जुलै रोजी न्यायालयाने त्यांचा २० जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. यासंदर्भात आरोपी विनोद तोमर यालाही अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय.Bail of MP Brijbhushan Singh in sexual harassment case
दिल्ली पोलिसांनी न्यायालयात जामीनाला विरोध अथवा समर्थन करीत नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. दुपारनंतरच्या सत्रात न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह यांचा जामीन मंजूर केल्याचा आदेश दिला. जामीन मिळाल्याने त्यांना मोठाला दिलासा मिळाला आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याची गरज नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्याचाच आधार घेत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.