नागपूर :जयताळा येथील संस्कार कॉन्व्हेंटमध्ये गणेश मंदिराच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद राऊत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तामिनीताई पटले, शंखनाद न्यूज चॅनलचे मार्केटिंग मॅनेजर विनोद अंभोरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात संस्कार कॉन्व्हेंट स्कूलच्या संचालिका पुष्पा चोपडे, शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर चोपडे ,स्वप्निल चोपडे, प्राची ताई चोपडे, शाळेच्या शिक्षिका यावले मॅडम, मेश्राम मॅडम, कोसे मॅडम आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी यावेळी सुंदर असे एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर केली व पालकांची मने जिंकली.विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना या निमित्ताने अतिथींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली .पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सान्वी भोयर, अंजली तुरकर, रौनक यावले ,चैतन्य बावने, विहान इंगोले ,मुबतशिस शेख यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर नृत्य आणि राष्ट्रगीताने झाली.
संस्कार कॉन्व्हेंटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा