शिवसेना पक्ष व चिन्हाच्या वादावर आज निवडणूक आयोगापुढे पुन्हा सुनावणी

0

नवी दिल्लीः शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नेमका कोणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांमधील वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे (Election Commission of India) आहे. केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही बाजूंनी आपापले दावे मांडणारी कागदपत्रे सादर करण्यात आल्यावर आता आयोगापुढे सुनावणी सुरु आहे. सोमवारी आयोगापुढे पुन्हा एकदा दोन्ही गटांचे युक्तिवाद रंगणार असून यावेळी नेमके कोणते नवे मुद्दे मांडले जाणार याकडे लक्ष लागलेले आहे. यापूर्वीची सुनावणी २० जानेवारी रोजी पार पडली होती व त्यात दोन्ही गटांना आयोगाने २३ जानेवारी पर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. आता आज सुनावणीची तारीख आहे.

जून महिन्यात शिवसेनेतील बंडानंतर राज्यातील सत्ता संघर्षावर 25 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदेंच्या गटांकडून आपापले दावे करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालायने उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळत शिवसेना पक्षाचा वाद निवडणूक आयोगाकडे सोपविला आहे. त्यानंतर धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून ठाकरे व शिंदे गटाला वेगवेगळी चिन्हे प्रदान केली. त्यानंतर दोन्ही गटांकडून आवश्यक शपथपत्रे व इतर कागदपत्रे आयोगापुढे सादर करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी ही येत्या १४ फेब्रुवारीला होणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा